esakal | Maharashtra: राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने ४ ऑक्टोबरपासून राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा सुरू झाल्यानंतर आता या शाळांमध्ये उपस्थितीचे प्रमाण वाढत आहे. मागील चार दिवसानंतर शुक्रवारी(ता.८) ५९.४८ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

राज्यात शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी बारावीपर्यंत च्या शाळा सुरू झाल्या आहेत. यात शाळेच्या पहिल्या दिवशी राज्याच्या ग्रामीण भागात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ५१.१७ टक्के होते. गेल्या चार दिवसांत विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली असून शुक्रवारी ५९.४८ टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. शहरी भागातही विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण ३४.९० टक्क्यांवरून ४६.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे.

हेही वाचा: मुंबई : आर्थिक विवंचनेतून एकवर्षात 23 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

दरम्यान, मुंबई विभागातील शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी उपस्थिती सर्वात कमी नोंदविली गेली. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये आठवी ते बारावीच्या ४ हजार २०७ शाळा असून ११ लाख ४२ हजार १८१ विद्यार्थी आहेत यातील ३ हजार ४६४ शाळा सुरू झाल्या असून ४ लाख ११ हजार ३८ विद्यार्थी उपस्थित होते.

राज्यात सर्वत्र शाळा सुरू झाल्याने पालकांमध्ये एक मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात पाचवी ते बारावीच्या ४३,०३० शाळा असून आठवी ते बारावीच्या १२, ४८८ शाळा, ज्युनियर काँलेज आहे. यात ५८ लाख ६५ हजार ७०३ विद्यार्थी असून ३२ लाख ८२ हजार १४८ विद्यार्थी आठवी ते बारावीचे आहेत.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ८ ऑक्टोबरला यातील पांचवी ते आठवीच्या ४० हजार ७७७ (९४.७६ टक्के) शाळा कनिष्ठ महाविद्यालय सुरू झाली आहेत. यामध्ये ३४ लाख ,८८ हजार ६३१(५९.४८ टक्के) विद्यार्थी उपस्थित होते. तर आठवी ते बारावीचे १५ लाख २१ हजार ७३९ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

loading image
go to top