वर्धा - राज्यातील शाळांमध्ये स्वच्छता, हिरवळ आणि सर्व समावेशक आनंददायक शालेय वातावरण नियमितपणे टिकवून ठेवण्यासाठी शालेय शिक्षणातून वर्णनात्मक परिवर्तन, स्वच्छतेबाबतच्या सवयी आणि पर्यावरणीय संरक्षण राखण्यासाठी स्वच्छ आणि हरित विद्यालय मूल्यांकन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग घेण्याचे निर्देश महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने दिले आहेत.