esakal | Corona Update : राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

Corona Update : राज्यात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या घटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात मृत्यूचा आकडा कमी झाला असून आज 28 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली.  मृतांचा एकूण आकडा 1,39,542 इतका झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 33,449 इतकी आहे.

हेही वाचा: राज्यातील वाहतूकदार संघटनाही बंदमध्ये सहभागी

नवीन बाधित रुग्णांची संख्या ही कमी झाली झाली. आज 2294 नवीन रुग्ण सापडले असून करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 65,77,872 झाली आहे.कालच्या तुलनेत आज बाधित रुग्ण कमी झाले आहेत. तर 1823 रुग्ण बरे होऊन घरी गेले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 64,01,287 इतकी आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून 97.32 % एवढे झाले आहे.

नागपूर, लातूर मंडळात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. तर ठाणे 9, नाशिक 3, पुणे 10, कोल्हापूर 3, औरंगाबाद 1, लातूर 2 मृत्यू नोंदवले गेले. सध्या राज्यात 2,41,892 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,093 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

loading image
go to top