esakal | Maharashtra: राज्यातील वाहतूकदार संघटनाही बंदमध्ये सहभागी
sakal

बोलून बातमी शोधा

बंद

राज्यातील वाहतूकदार संघटनाही बंदमध्ये सहभागी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील 40 लाख वाहतूकदार सोमवारी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होणार आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अद्यक्ष बल मलकीत सिंग यांनी सुद्धा बंद 100 टक्के यशस्वी पूर्ण करण्याचे आवाहन वाहतुकदारांना केले असून ट्रक, टेम्पो, कंटेनर, टँकर, बसेस हे वाहन बंद राहणार असून, मालवाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खैरी प्रकरणात सोमवारी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने बंद पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील तीनही पक्ष बंद 100 टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामध्ये काँग्रेसच्या वाहतूकदार संघटना सुद्धा सक्रिय राहणार असून, ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने सुद्धा बंद मध्ये सहभागी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईत टॅक्सी मेन्स युनियनचा बंदला बाहेरून पाठिंबा असून, टॅक्सी सुरूच राहणार असल्याचे टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए एल क्वॉड्रोस यांनी सांगितले आहे.

loading image
go to top