पंजाब, राजस्थानप्रमाणं महाराष्ट्रातही इंधन करकपात व्हावी; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM_Petrol-Diesel
पंजाब, राजस्थानप्रमाणं महाराष्ट्रातही इंधन करकपात व्हावी; काँग्रेसची मागणी

पंजाब, राजस्थानप्रमाणं राज्यात करा इंधन कर कपात; काँग्रेसची मागणी

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : पंजाब आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकारने ज्या प्रकारे करांमध्ये कपात करुन पेट्रोल-डिझेलच्या किंमती किमी केल्या त्याचपद्धतीनं महाराष्ट्र सरकारनेही कर कपात करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

हेही वाचा: 'आई चूकली असेल, म्हणून तिला'...चेतनच्या वीर दासला कानपिचक्या

नसीम खान म्हणतात, "केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळं महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह गॅसचेही दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल सुरु आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं वाहतुक खर्चात वाढ होऊन महागाईत वाढ होत आहे. कोरोनाच्या काळात कामधंदा बंद झाल्यानं अनेकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यातच आता महागाईत प्रचंड वाढ झाल्यानं जनता भरडली जात असून लोकांचं जगण कठीण झालं आहे."

हेही वाचा: राजकीय नेत्यांनी पैसे थकवले, मुंबईत कॅटरर्स मालकाची आत्महत्या

केंद्र सरकार जीएसटीतून मिळणारा राज्याच्या वाट्याचा पैसा वेळेवर देत नाही, तसेच पेट्रोल-डिझेलवरील सेसमधील हिस्साही राज्यांना न मिळता केंद्रालाच मिळतो. यातून राज्याची आर्थिक कोंडी सुरु आहे. पण आपल्या जनतेला आपल्याला दिलासा देणंही गरजेचं आहे. त्यामुळं जनतेच्या हिसातासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख म्हणून आपण इंधनावरील सेस कमी करुन जनतेला दिलासा द्यावा, अशी विनंती खान यांनी आपल्या पत्रातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

loading image
go to top