Maharashtra SIR Draft Voter List 2026
esakal
महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतर आज प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून, मोठ्या प्रमाणात मतदारांची नावं सध्याच्या यादीत नसल्याची माहिती समोर आली आहे. घराघरात जाऊन केलेलं सत्यापन, गणना प्रपत्र जमा न होणं, डिजिटायझेशन न होणं आणि इतर कारणांमुळे अनेक मतदारांची नावं प्रारूप यादीत समाविष्ट झालेली नाहीत.