Soybean Yellow Mosaic: सोयाबीनच्या 'या' वाणांवर होतोय येलो मोझॅकचा हल्ला, 'करपा' रोगानेही वाढवली डोकेदुखी

येलो मोझॅक या विषाणूजन्य रोगामुळे सोयाबीन पीकाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची चिन्ह दिसत आहेत. त्याचबरोबर सोयाबीनवर 'करपा' रोगाचा प्रादुर्भावही वाढला आहे.
Soybean Yellow Mosaic: सोयाबीनच्या 'या' वाणांवर होतोय येलो मोझॅकचा हल्ला, 'करपा' रोगानेही वाढवली डोकेदुखी
Updated on

Yellow Mosaic on Soybean:सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे उशिरा येणार्‍या वाणावर प्रादुर्भावाचे प्रमाण जास्त असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. कीडीजन्य रोगामुळे सोयाबीन उत्पादनात यंदा मोठी घट येण्याचा धोका दिसून येत आहे.


जिल्ह्यात सोयाबीनच्या उभ्या पिकावर येलो मोझॅकने हल्ला चढवला आहे. शेतातील उभे पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. सोयाबीन पिकावर एकामागून एक संकट येत आहेत. येलो मोझॅकचे प्रमाण वाढले आहे. शेतकर्‍यांनी हजारो रुपये खर्च करून सोयाबीनची पेरणी केली. उगवलेले सगळे सोयाबीन या रोगामुळे फस्त होण्याची भीती वाढली आहे.

विशेष म्हणजे, उशिरा येणार्‍या वाणावर हा प्रादुर्भाव जास्त दिसत आहे. तज्ज्ञांच्या मते दूषित बियाण्यांतून पांढर्‍या माशीची उत्पत्ती होते. त्यानंतर हा रोग पसरतो. परिणामी, पांढर्‍या माशीचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. अनेक शेतकर्‍यांनी दुबार, तिबार पेरणी केली. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सोयाबीनवर रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. शेतकर्‍यांनी उपाययोजना म्हणून महागडे औषधेदेखील फवारलीत. मात्र, याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता उत्पन्नाची अपेक्षा सोडाच केलेला खर्चदेखील निघेल की नाही, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.

यावर्षी अतिवृष्टी झाल्याने आधीच सोयाबीन, कापसाची पेरणी अडचणीत आली आहे. उरलेल्या पिकांतून चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांना आहे. मात्र, सोयाबीनवर येलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पन्न हाती येईल की नाही, असा प्रश्‍न शेतकर्‍यांना पडला आहे.(Latest Marathi News)

Soybean Yellow Mosaic: सोयाबीनच्या 'या' वाणांवर होतोय येलो मोझॅकचा हल्ला, 'करपा' रोगानेही वाढवली डोकेदुखी
महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करा; संसदेच्या नैतिकता समितीचा 500 पानांचा रिपोर्ट समोर

कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे म्हणाले की ’सोयाबीनच्या उशिरा येणार्‍या वाणावर येलो मोझॅकचे जास्त प्रमाण दिसत आहे. अर्ली वाणावर हे प्रमाण कमी आहे. पूर्ण शेत पिवळे झाले असेल तर फवारणी करूनही त्यांचा फायदा होणार नाही. ज्याठिकाणी प्रादुर्भाव कमी तेथे शेतकर्‍यांनी संयुक्त बुरशीनाशकांची फवारणी करवी. येलो मोझॅक सोबत आता करपा रोगही दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Soybean Yellow Mosaic: सोयाबीनच्या 'या' वाणांवर होतोय येलो मोझॅकचा हल्ला, 'करपा' रोगानेही वाढवली डोकेदुखी
Sanjay Tadsarkar : ज्येष्ठ शिल्पकार संजय तडसरकर यांचं निधन; वयाच्या 56 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com