

Maharashtra SSC Exam 2027
esakal
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून परीक्षेची तारीख कधी जाहीर होणार, याची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ११ मार्चपर्यंत चालणार आहे. तर बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे.