

SSC Exam
ESakal
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी बारावी बोर्ड परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. निकालाच्या संभाव्य तारखा आता समोर आल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बारावीचा निकाल तर त्यानंतर आठवड्याभराने दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. SSC HSC Result Date