

Rising losses in MSRTC spark concern over financial control and operations
Esakal
मुंबई, ता. १५ गत आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चलनीय उत्पन्न ११ हजार ४७५ कोटी रुपये नोंदवले असून, १२ हजार ०६६ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. त्यामुळे एसटीला ५९१ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. दैनंदिन सरासरी उत्पन्न ३१ कोटी ४० लाख रुपये, तर खर्च ३३ कोटी रुपये आहे. त्यामुळे दररोज सुमारे एक कोटी ६० लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.