

Maharashtra Transport News
esakal
मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बस महामंडळाच्या आर्थिक गणितावर मोठा भार टाकत असल्याचे समोर आले. या बसमुळे होणारा तोटा भरून काढण्यासाठी महामंडळाने राज्य सरकारकडे ३,१९१ कोटी ४२ लाख रुपयांच्या ‘वायबिलिटी गॅप फंडिंग’ची मागणी केली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच दिली.