

Hardik Pandya Ferrari entry MI practice IPL 2026
esakal
Hardik Pandya fashion and Ferrari video IPL : मुंबई इंडियन्सला २०२० नंतर इंडियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावता आलेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यानंतर MI चा ग्राफ उतरताच राहिला आणि त्यानंतर नेतृत्वबदल झाला. हार्दिक पांड्याकडे मुंबईचे कर्णधारपद दिले गेले आणि मागील पर्वात संघाने प्ले ऑफमध्ये प्रवेशही केला. पण, जेतेपदाचा दुष्काळ कायम आहे. मात्र, यावेळी MI चा संघ पाहिल्यास आयपीएल ट्रॉफी आपल्याकडेच, असे चाहत्यांना वाटणे साहजिकच आहे. मुंबईच्या खेळाडूने नेट्समध्ये तसा सरावही सुरू केला आहे. पण, कर्णधार हार्दिक पांड्या ज्या अतरंगी अवतारात सराव सत्रात पोहोचला त्याची चर्चा रंगली आहे.