ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांना मिळणार पारंपरिक गणवेश - दिवाकर रावते

रावते यांच्या काळात एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखली होती.
Divakar-Ravate
Divakar-Ravatesakal
Summary

रावते यांच्या काळात एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखली होती.

मुंबई - वर्ष २०१७ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री व एस टी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचा कलर बदलवला होता. त्यामुळे महामंडळातील एकूण कर्मचारी संघटनानी त्याचा विरोध केला होता. परिणामी गणवेश योजनाच गेल्या सुमारे ६ वर्षांपासून ठप्प होती. मात्र, आता एसटी महामंडळाने नवीन पारंपरिक गणवेश एसटी कर्मचाऱ्यांना देण्याच्या दृष्टीने निविदा काढली असून, एसटीच्या चालक, वाहक आणि पर्यवेक्षकांना खाकी आणि मॅक्यनिकल यांना निळ्या रंगाचे वर्षाला कापड ऐवजी तयार फोन गणवेश आणि ५०० रुपये भत्ता देण्यात येणार आहे. २३ मार्च रोजी अंतिम निविदा प्रक्रिया पार पडणार आहे.

रावते यांच्या काळात एसटीच्या चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक यांचा गणवेश बदलण्याची योजना आखली होती. त्यानुसार त्यांनी नवी मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेशी करार करून त्यांच्या मार्फत कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे डिझाईन बनवले होते. मात्र, रंगीबेरंगी गणवेश असल्याने कर्मचाऱ्यांनी गणवेश नाकारले होते.

Divakar-Ravate
ST Mahamandal : ५१५० इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात होणार दाखल

एसटी कर्मचाऱ्यांकडून गणवेशाचा विरोध सुद्धा दर्शवला होता. तर एसटी महिला कर्मचाऱ्यांनी सुद्धा अपणी खाकी नहीं दुंगी असा उपक्रम हाती घेतला होता. अखेर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना लक्षात घेता पारंपारिक गणवेशालाच मंजुरी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळातील १३ संवर्गातील सुमारे ७० हजार कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन गणवेश दिल्या जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com