ST Resignation of Officers : एसटी कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांचे राजिनामे

एसटीच्या संपानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केली होती.
Resignnation
Resignnationsakal
Summary

एसटीच्या संपानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केली होती.

मुंबई - एसटीच्या संपानंतर अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांची एसटी कष्टकरी जनसंघाची स्थापना केली होती. संघंटनेची पाळेमूळे काहीच महिन्यात राज्यभर पसरवण्यात आले असून, 86 हजार कर्मचारी संघटनेचे सदस्य असल्याचा दावा सदावर्ते यांनी केला आहे. मात्र, या काही दिवसांमध्ये सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे व्हायरल होत असून, सदावर्तेंसोबतच्या संभाषणाच्या संतापजनक क्लिप सुद्धा व्हायरल होत आहे.

सदावर्ते यांनी स्थापना केलेल्या एसटी कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष त्यांच्या पत्नी अ‍ॅड. जयश्री पाटील यांना करण्यात आल्या आहे. संप काळात दोघेही पती-पत्नीचा संपात सक्रीय सहभाग होता. एसटीचे शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप तब्बल सहा महिने सुरू होता. दरम्यान सदावर्ते यांच्या नेतृत्वात एक तर मसनात नाहीतर शासनात अशी भुमीका संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र, एसटीच्या विलीनीकरणाची मागणी अद्याप प्रलंबीत असून, कर्मचाऱ्यांना संपातून माघार घ्यावी लागली.

मात्र, त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा जनसंघ काढूनही कर्मचाऱ्यांचे समस्या सुटत नसल्याचे एसटी कर्मचारी सदावर्तेंना फोन करून संताप व्यक्त करत आहे. त्याचे ऑडिओ सुद्धा समाजमाध्यमांवर व्हायरल केले जात आहे. जनसंघाचे कोणतेही पदाधिकारी राजीनामे देत नसून, विरोधात असलेल्या एसटी कर्मचारी संघटनांचा जनसंघाची बदनामी करण्याचा हा डाव असल्याचा आरोप अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com