'जो पगार साहेबांच्या ड्रायव्हरला आहे. तो आम्हाला हवा' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'जो पगार साहेबांच्या ड्रायव्हरला आहे. तो आम्हाला हवा'
'जो पगार साहेबांच्या ड्रायव्हरला आहे. तो आम्हाला हवा'

'जो पगार साहेबांच्या ड्रायव्हरला आहे. तो आम्हाला हवा'

गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज अंतिम निर्णय होणार अशी चर्चा रंगली होती. अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी शासनाच्यावतीनं भूमिका व्यक्त केली. त्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ केली आहे. मात्र त्या पत्रकार परिषदेतील माहिती तात्काळ सोशल मीडियातून व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्या दरम्यान कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयाचा निषेध केल्याचे दिसून आले आहे. आम्ही काही झालं तरी विलिनीकरणाच्या नियमावर ठाम असल्याचे सांगितले आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांशी बोलून काय तो निर्णय कळवणार असल्याचे कर्मचाऱ्यांच्यावतीनं सांगण्यात आले आहे.

एस टी कर्मचारी हे संप मागे घेणार की तो वाढवणार याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. या संपाचे नेतृत्व सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या बाजूनं भूमिका घेत सरकारला धारेवर धरल्याचे दिसून आले आहे. सध्या मुंबईतील आझाद मैदानात एस टी कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत. कर्मचारी हे विलिनीकरणाच्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत आहे. आतापर्यत या संपावरुन अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार या संपाविषयी म्हणाले, एस टी चे विलिनीकरण करणे अवघड आहे. तसा निर्णय घेतला गेल्यास शासनापुढे अनेक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ST Strike: एस टी संपामुळे फेरीवाल्यांची भाकरी हिरावली;पाहा व्हिडिओ

हेही वाचा: इंदापूर : एस. टी कामगार संपामुळे ग्रामीण दळणवळण यंत्रणा कोलमडली

कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, आमची मागणी विलिनीकरणाची आहे. पगारवाढ ही आमची फसवणूक केली आहे. शासनाला आमची काळजी नाही. आतापर्यत कधीही पगारवाढ शासनानं दिलेली नाही. आता कर्मचारी त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. चार ते पाच हजार पगारवाढ आम्हाला नको आहे. जो पगार साहेबांच्या ड्रायव्हरला आहे. तोच पगार आम्हाला हवा आहे. अशा प्रतिक्रिया कर्मचारी देत आहे.

loading image
go to top