इंदापूर : एस. टी कामगार संपामुळे ग्रामीण दळणवळण यंत्रणा कोलमडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूर : एस. टी कामगार संपामुळे ग्रामीण दळणवळण यंत्रणा कोलमडली

इंदापूर : एस. टी कामगार संपामुळे ग्रामीण दळणवळण यंत्रणा कोलमडली

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर (पुणे) : दिवाळीनंतर राज्यात सुरू झालेल्या एस. टी कामगार संपामुळे ग्रामीण दळणवळण यंत्रणा कोलमडून गेली आहे. संपास पाच दिवस झाले तरी सर्वमान्य तोडगा अद्याप निघाला नाही.सरकारने कामगारांना निलंबित करण्याचे धोरण अवलंबल्याने संप चिघळण्याची चिन्हे आहेत. सरकारने कामगारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.

दि.१ जून २०२१ रोजी राज्यातील सामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीने ७३ वर्षे पूर्ण करून ७४ व्या वर्षात पदार्पण केले.मात्र खाजगी वाहतूकदारांकडून ५०० गाड्या भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेतल्याने एस.टी महामंडळाची वाटचाल खाजगीकरणा कडे सुरू झाल्याचे सरकारी धोरण दिसून आल्याने कामगार नाराज झाले. कोरोना महामारीत ८ हजार पेक्षा जास्त कर्मचारी कोरोना बाधित होवून २६१ कर्मचारी मरण पावले. परिवहन मंत्री वामनराव परब यांनी मृत कर्मचा-यांच्या वारसांना ५० लाखरुपयांचे विमा कवच जाहीर केले मात्र फक्त १० ते १२ मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सदर विमा रक्कम मिळाली आहे.

कोरोना बाधित कर्म चा-यांना वैद्यकिय खर्च प्रतिपूर्ती देण्यातआली नाही. कर्मचा-यास मृत्यू आल्यास वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. कामगार करार तरतुदीनुसार शासकीय कर्मचा-यांप्रमाणेएस.टीकर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्याचे मान्य करण्यात आले. मात्र जुलै २०१८ ते सप्टेंबर २०१८ या ३ महिन्यांची २ टक्के महागाईभत्याची थकबाकी व माहे जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०१९ या ९ महिन्यांची ३ टक्के महागाई भत्याची थकबाकी कामगारांना अद्याप मिळाली नाही. शासकीय कर्मचा-यांना माहे डिसेंबर २०१९ पासून ५ टक्के वाढीव महागाई भत्ता देण्यात आला मात्र सदर ५ टक्के वाढीव महागाई भत्ता कामगारांना थकबाकीसह लागू करण्यात न आल्याने कामगार नाराज आहेत.शासकीय कर्मचा-यांप्रमाणे वेतनवाढीचा दर ३ टक्के, घरभाडे भत्ता ८,१६,२४ टक्के देण्याचे शासनाने मान्य केले, त्याची अंमलबजावणी झाली नाही.दि.१ जून२०१८ रोजी शासनाने वेतनवाढी पोटी ४८४९ कोटी रुपयांचे पॅकेज जाहिर केले मात्र त्याचे वाटप झाले नाही. त्यामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे. त्याचे प्रतिबिंब संपात दिसून येत असल्याने संप मिटत नाही. त्यामुळे शासन, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी जनतेस वेठीस न धरता यातून कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे. त्याचबरोबर गाड्यांचे लॉक

हेही वाचा: राज ठाकरे शरद पवारांच्या भेटीला; 'लालपरी'चा मार्ग होणार का खुला?

काढून ते ८० वर करणे, सर्व गाड्यात वाय फाय सुविधा देणे, रस्ते चांगले झाल्याने गाड्या वेळेत पोहोचणे, खाजगी फूडमॉल होत असलेली प्रवाश्याची लूट लक्षात घेता दर्जेदार व रास्त किंमत असलेले मॉल उभा करणे गरजेचे आहे. गाड्यांचे ट्रॅक रेकॉर्डची प्रवाश्यां ना लिंक देणे, ऑनलाईन बुकिंग सुविधा उपलब्ध करणे तसेच प्रवासातदेण्यात येणाऱ्या सवलतींचा पुनर्विचार करणे गरजेचे आहे तसेच शासनाचे एस टी खाजगीकरण

करण्याचे धोरण नसल्याचे व कामगारांनामदत करण्याचे प्रामाणिक धोरण दिसले पाहिजे, कामगार नेत्यांनी आपले मौन धोरण सोडून सुसंवाद साधला पाहिजे या सर्व प्रकियेत तुकाराम मुंढे यांच्यासारख्या अधिकाऱ्यास स्वतंत्र देऊन काम करण्याची संधी दिल्यास कायमस्वरूपी तोडगा निघेल. तरच एस टी स पुन्हा गतवैभव प्राप्त होईल.

loading image
go to top