राज्यांच्या गुन्हेगारीची आकडेवारी आली समोर, UP नंतर एकूण गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

राज्यांच्या गुन्हेगारीची आकडेवारी आली समोर, UP नंतर एकूण गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

मुंबई, ता. 30 : देशात दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांचा विचार केल्यास त्याबाबत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात 2019 मध्ये पाच लाख नऊ हजार 433 गुन्हे दाखल झाले असून याबाबत उत्तर प्रदेश सहा लाख 28 हजार 578 गुन्ह्यांसह पहिल्या क्रमांकावर आहे.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या (एनसीआरबी) 2019च्या गुन्ह्यांच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रापाठोपाठ तामीळनाडू, केरळ, गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधीक गुन्हे दाखल झाले आहेत. देशातील 29 राज्य व केंद्र शासित प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये ही तुलना करण्यात आली आहे.

गुन्हे दाखल होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर असला, तरी प्रति लाख लोकसंख्यामागे दाखल गुन्ह्यांचे प्रमाण पाहिल्यास महाराष्ट्रातील स्थिती चांगली आहे. याबाबत राज्य देशात सहाव्या क्रमांकावर आहे. याबाबत देशात केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये प्रति लाखांमागे 1287.7 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ गुजरात (631.6), तामिळनाडू (600.3) हरियाणा (577.4) आणि  मध्यप्रदेश (478.9)  गुन्ह्यांचं प्रमाण आहे.

बिहार आणि उत्तर प्रदेशपेक्षा राज्य सुरक्षीत

याशिवाय गंभीर गुन्ह्यांचा विचार केला तर देशात हत्यांमध्ये राज्य तिस-या क्रमांकावर आहे. राज्यात 2019 मध्ये 2142 हत्येचे गुन्हे दाखल झाले होते. याबाबत उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधीक हत्या 2019 मध्ये गढल्या आहेत. उत्तरप्रदेश व बिहारमध्ये 2019 मध्ये अनुक्रमे 3806 आणि 3138 हत्यांचे गुन्हे दाखल झाले आहेत.

maharashtra stands on second position in terms of crime cases registered in state

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com