
आज दिवसभरात राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. तर पूरामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागपूर जिल्ह्यातील अनेक भागाला पूरामुळे फटका बसला असून शेतपिकाचे नुकसान झालं आहे. तर विदर्भातील गडचिरोली भागात चारचाकी गाडी वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान नाशिकमध्येही पावसामुळे पूर आला आहे. महाराष्ट्रासहित गुजरातमध्येही पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर पूरामध्ये अनेक जनावर वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली असून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यात विदर्भातील गडचिरोली, उत्तर भारतातील नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
महाराष्ट्रासह गुजरातमध्येही जोरदार पाऊस सुरू असून पूराने राजकोट जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांच्या शेजारी असलेल्या लोकवस्त्यामध्ये पाणी शिरलं आहे तर राजकोटमध्ये पूराच्या पाण्यामुळे मंदिर वाहून गेल्याचा प्रकार घडला आहे.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून नाशिकमध्ये मुसळधार पावसाने रस्ते आणि काही घरे पाण्याखाली गेले आहेत. तर पूराच्या पाण्यामुळे नाशिकमधील सुरगाणाच्या अलंगुणचा बंधारा फुटला आहे त्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली आहे.
राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
भंडारदरा, निळवंडे हे धरणे ५० टक्के भरले
इरई धरणाचे ४ दरवाजे उघडले
दिंडोरीतील ओझरखेड धरण ओव्हरफ्लो
पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ, मुठा नदीत विसर्ग सुरू
मराठवाड्यासह विदर्भात आणि महाराष्ट्रातील विविध भागात पावसाने थैमान घातलं असून पूर आणि धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली आहे. तर राज्यभरातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. याच पावसात एक स्कॉर्पिओ वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूर जिल्ह्याच्या केळवद येथील बामनमारी येथे ही घटना घडली आहे. वाहून गेलेल्या गाडीमध्ये 8 प्रवासी असल्याचे सांगितले जात असून, त्यांचा युद्धपातळीवर शोध घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या घटनेत गाडीतील सहा जणांचा मृत्यू झाल्याची भीत व्यक्त केली जात आहे.
मुंबईत आज ऑरेंज अलर्ट, अनेक ठिकाणी पावसाची हजेरी
मुंबईत आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 14 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. मुंबईत काल रात्री अधूनमधून पाऊस पडत होता. मुंबईच्या पश्चिम उपनगर परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. दरम्यान अद्याप तरी पाणी माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.