esakal | Maharashtra : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘पोषक वडी’
sakal

बोलून बातमी शोधा

न्यूट्रिटिव्ह स्लाईस

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ‘पोषक वडी’

sakal_logo
By
प्रभाकर कोळसे

नंदोरी (जि. वर्धा) : राज्यातील शासकीय शाळांतील पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आता पोषण आहारात पोषक वडी दिली जाणार आहे. ज्वारी, बाजरी, तांदूळ, नाचणी हे मुख्य घटक असलेल्या पाच प्रकारच्या वड्या दिल्या जाणार आहेत. शाळास्तरावर या वड्यांच्या वितरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.

शालेय पोषण आहार कक्षातर्फे ‌शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप‌ यांनी सर्व जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना पोषक वड्यांच्या वितरणाबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. पोषक वड्यांची मागणी नोंदविल्यापासून साठ दिवसांत मागणी प्रमाणे पुरवठा करणे बंधनकारक आहे. या कालावधीमध्ये पुरवठा करण्यास पुरवठादार अयशस्वी ठरल्यास विलंबाने पुरवठा झालेल्या पोषक वड्यांचे वजन, विलंबाच्या कालावधीची माहिती द्यावी.

हेही वाचा: मोदींनी केला दहा लाख कोटींच्या गतीशक्ती योजनाचा शुभारंभ

तसेच पुरवठा करण्यात आलेल्या पोषक वड्यांचा दर्जा, प्रमाण किंवा वेष्टणाबाबत मुख्याध्यापक समाधानी नसल्यास त्यांनी पोषक वडी बदलून देण्याबाबत लेखी स्वरूपात पुरवठादारास सूचना करावी. त्यानुसार पुरवठादाराने सात दिवसांत स्वखर्चाने पोषक वड्या बदलून देणे बंधनकारक आहे. पुरवठादाराने पोषक वड्या बदलून न दिल्यास संचालनालयाला कळवावे आणि तेवढ्या वड्यांची रक्कम‌ कपात करण्याची शिफारस करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पटसंख्येनुसार मागणी

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून पोषक वड्या दिल्या जाणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून‌ पोषक वड्यांचा पुरवठ्यासाठी कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शाळांना पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीच्या पटसंख्येनुसार पोषक वड्यांची मागणी नोंदवावी लागणार आहे. पाच प्रकारच्या १२० ग्रॅमच्या पोषक वड्या २४ दिवस विद्यार्थ्यांना वितरित करावयाच्या आहेत. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यात पाच दिवस दररोज ३० ग्रॅमच्या चार वड्या, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ४५ ग्रॅमच्या सहा वड्या सेवन करणे आवश्यक आहे.

loading image
go to top