Maharashtra Sugar Season Shows Positive Growth
सोमेश्वरनगर : चालू साखर हंगामाच्या पहिल्या दीड महिन्यात १८४ साखर कारखान्यांनी ३६७ लाख टन उसाचे गाळप केले असून ३० लाख टन साखरनिर्मिती केली आहे. गतहंगामाच्या तुलनेत साखर उतारा ०.३० टक्क्यांनी अधिक आहे. साखर उतारा आणि गाळप या दोन्ही बाबींमध्ये खासगींपेक्षा सहकारी कारखाने पुढे आहेत. दरम्यान, गाळपात सोलापूर जिल्हा तर साखर उताऱ्यात कोल्हापूर जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.