यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; एफआरपी झाला निश्चित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sugercane cuttres

यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; एफआरपी झाला निश्चित

मुंबई : यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज्यातील ऊस लागवडीचा आढावाही घेण्यात आला. (Maharashtra sugarcane crushing season will start from October 15 FRP is fixed)

यंदा ऊसाचं क्षेत्र वाढलं असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं. तसेच यंदाच्या हंगामासाठी सुमारे १४ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली असून राज्यात ऊस लागवडीचं क्षेत्र वाढलं आहे. यामुळं यंदा सरासरी ९५ टन प्रती हेक्टर ऊस उत्पादन अपेक्षित आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: पाकचा कट! मानवनिर्मित लम्पी व्हायरस भारतात पाठवला; बाबा रामदेव यांचा दावा

दरम्यान, या हंगामात सुमारे २०३ कारखाने सुरू होणार असून यंदा १३८ लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाराष्ट्राने गेल्या हंगामात १३७.३६ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन केले असून उत्तर प्रदेश राज्याला मागे टाकलं आहे.

हेही वाचा: ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल ही भविष्याची नांदी - फडणवीस

यंदाचा गाळप हंगाम सरासरी १६० दिवस अपेक्षित असून यंदा गाळप होणाऱ्या ऊसासाठी १०.२५ टक्के बेसिक उताऱ्यासाठी प्रति मेट्रिक टन ३,०५० रुपये एफआरपी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Sugarcane Crushing Season Will Start From October 15 Frp Is Fixed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..