पाकचा कट! मानवनिर्मित लम्पी व्हायरस भारतात पाठवला; बाबा रामदेव यांचा दावा

बाबा रामदेव यांनी हा व्हायरस मानवनिर्मित असल्याची शंका उपस्थित केली आहे.
Ramdev Baba
Ramdev BabaTeam esakal

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात पाळीव जनावरांना लागण झालेल्या लम्पी व्हायरसबाबत योगगुरु बाबा रामदेव यांनी खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. लम्पी व्हायरस पाकिस्तानातून आला असून तो मानवनिर्मित असण्याची शक्यता आहे, त्यामुळं व्हायरसची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Pakistan conspiracy Man made lumpy virus sent to India Baba Ramdev claim)

Ramdev Baba
ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल ही भविष्याची नांदी - फडणवीस

रामदेव म्हणाले, देशातील अनेक राज्यांमध्ये लम्पी व्हायरस वेगानं पसरत आहे. यामध्ये उत्तराखंडचाही समावेश आहे. या व्हायरसच्या फैलावामुळं जनावरांचा मृत्यू होत आहे. हा व्हायरस मानवनिर्मित असून पाकिस्तानातून भारतात आला आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Ramdev Baba
Ram Shinde : अमेठी जिंकली आता बारामतीही जिंकणार - राम शिंदे

वातावरणातील बदलामुळं पसरणाऱ्या डेंग्यूचा उल्लेख करत रामदेव म्हणाले, पतंजलीनं डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी संशोधन केलं आहे. यामध्ये गुळवेल, कोरफड, वेदा गवत, डाळींब आणि पेरुचं पंचामृत रामबाण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच उत्तराखंडमधील धार्मिक उन्माद आणि धर्मांतरणाच्या घटना या चिंताजनक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

मदरसे योग्य आहेत तर घाबरण्याची नाही गरज

उत्तराखंडमध्ये मदरशांच्या तपासणी करण्याच्या मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या निर्णयाला रामदेव यांनी पाठिंबा दर्शवला आहे. जर मदरसे योग्य आहेत तर घाबरण्याची गरज नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com