Pavitra Portal teacher recruitment 2026
esakal
पुणे : राज्यात रखडलेल्या शिक्षक भरतीला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील ‘मुलाखतीशिवाय’ प्रकारातील शिक्षक भरतीनंतर आता ‘मुलाखतीसह’ होणारी तब्बल १० हजार ३२८ पदांची भरती प्रक्रिया सप्टेंबरअखेर पूर्ण होईल. याच प्रक्रियेतील शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये राबविण्यात येणार (Maharashtra teacher vacancy 2026) आहे.