राज्य सरकराचं दुर्लक्ष, महाराष्ट्रातील गावांमध्ये तेलंगणाकडून जनगणना;१४ वादग्रस्त गावांत दोन्ही राज्यांची समांतर प्रक्रिया

Maharashtra-Telangana Border Dispute :१४ गावांमध्ये तेलंगण सरकारने मंगळवारपासून जनगणना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारही या गावांत स्वतंत्र जनगणना घेणार असल्याचे समजते.
Maharashtra-Telangana Border Dispute

Maharashtra-Telangana Border Dispute

esakal

Updated on

सुग्रीव गोतावळे

जिवती : महाराष्ट्र-तेलंगणा सीमावादात अडकलेल्या जिवती तालुक्यातील १४ वादग्रस्त गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून एकाचवेळी जनगणना सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. यात एकाच व्यक्तीची नावे दोन्ही राज्यांच्या जनगणना यादीत नोंदवली जाण्याची शक्यता आहे. जिवती तालुक्यातील परमडोली, तांडा, कोठा, मुकादमगुडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, महाराजगुडा, पदमावती, इंदिरानगर, अंतापूर, येसापूर, नारायणगुडा, भोलापठार आणि लेंडीगुडा या १४ गावांमध्ये तेलंगण सरकारने मंगळवारपासून जनगणना सुरू केली आहे. महाराष्ट्र सरकारही या गावांत स्वतंत्र जनगणना घेणार असल्याचे समजते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com