कोविड-19: जूलै महिन्यात चाचण्यांची संख्या दुप्पट

वृत्तसंस्था
रविवार, 2 ऑगस्ट 2020

जूलै महिन्यात कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त झाले आहे.

पुणे- जूलै महिन्यात कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त झाले आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार जूलै महिन्याच्या सुरुवातील महाराष्ट्रात 9.9 लाख कोविड-19 चाचण्या झाल्या होत्या, त्या वाढून 31 जूलै रोजी 21.3 लाख झाल्या आहेत. त्यामुळे एका महिन्यात चाचण्यांचे प्रमाण 103 टक्क्यांनी वाढले आहे. 

कोरोनामुळे एसटी सेवेला ‘ब्रेक’ लागला आणि कर्मचाऱ्यांवर आली हि वेळ

कोविड-19 चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाणही वाढत गेले आहे. जास्तीतजास्त चाचण्या करुन पोझिटिव्हिटी रेट आणि मृत्यूदर कमी करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले असले तरी पॉझिटिव्हिटी रेट हा काही प्रमाणात वाढला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पॉझिटिव्हिटी रेट 18.7 टक्के होता, तो किंचितचा वाढून 19.8 टक्के झाला आहे. 

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, पॉझिटिव्हिटी रेट दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ 5 टक्क्यांपेक्षा कमी असणे म्हणजे महामारी नियंत्रणात येत असल्याचं म्हटलं जातं. जूलैच्या तिसऱ्या आठवड्यात  पॉझिटिव्हिटी रेट 23 टक्के होता. त्यामुळे  पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असला तरी जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्धारित लक्ष्यापेक्षा तो कितीतरी कमी आहे. त्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याची गरज व्यतक्त केली जात आहे. 

"राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षमता आहे का?"

ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोविड-19 चाचण्या करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांना चाचण्यांसंबंधित सुविधा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात चाचण्यांचे प्रमाणात आणखी वाढ होईल आणि  पॉझिटिव्हिटी रेट कमी होईल, असं सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शिवाय लवकरच 110 नवीन लॅब सुरु करण्यात येणार असल्याचं सरकार सांगितलं आहे. 

सुरुवातील मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये दिवसाला 3,500 लोकांची चाचणी घेण्यात येत होती. आता यात वाढ करण्यात आली असून दिवसाला 8 हजार चाचण्या होत आहेत. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर 3.6 टक्के आहे, तर देशाचा 2 टक्के आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra testing doubled in july