Maharashtra TET 2026 registration and exam details
esakal
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२६’ (टीईटी) यंदा २८ जूनला होणार (Maharashtra TET 2026) आहे. राज्यातील तब्बल दोन लाख २६ हजार २६३ शिक्षक परीक्षा देणार आहेत. सध्या सेवेत असणाऱ्या शिक्षकांसह नियमित परीक्षार्थी, अशा एकूण चार लाख २८ हजार १२२ परीक्षार्थींनी टीईटी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण सहा लाख १२५ अर्ज केले आहेत.