
शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून लागू करण्यात आलीय. यानंतर पहिलीच्या वर्गासाठी तासिकांचे नवे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. तिसरी भाषा लागू केल्यानंतर या भाषेसाठी इतर विषयांच्या तासिकांचा वेळ कमी करण्यात आला आहे. कला, शारीरिक शिक्षण अन् कार्यशिक्षण या विषयाच्या तासिकांचा वेळ १० ते २५ मिनिटे इतका कमी करण्यात आल्याचं समोर आलंय. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या विषयांचीच वेळ कमी केल्यानं आता चिंता व्यक्त केली जात आहे.