
पुणे : शेतकरी प्रयोगशील व कष्टाळू असला, तरी शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीची कमतरता आहे. त्यामुळे ‘पोकरा’च्या धर्तीवर पाच वर्षांसाठी २५ हजार कोटी रुपयांची नवी कृषी योजना लागू करण्याचा प्रस्ताव आहे, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी ‘अॅग्रोवन’च्या ‘शाश्वत शेती परिषदे’त दिली.