esakal | Corona Update: राज्यात दिवसभरात 61 हजार रुग्णांची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

corona
Corona Update: राज्यात दिवसभरात 61 हजार रुग्णांची कोरोनावर मात
sakal_logo
By
टीम सकाळ

मुंबई- महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 63 हजार 309 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर 985 रुग्णांना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 44 लाख 73 हजार 394 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत 61 हजार 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 83.4 टक्के आहे, तर मृत्यूदर 1.5 टक्के आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 6 लाख 73 हजार 481 सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य विभागाने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

आज 985 रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक मृत्यू पुणे मनपा 117, ठाणे मनपा 92 आणि मुंबई मनपा 78 येथे नोंदवण्यात आले. नव्या रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा 50 हजाराच्या वर गेला असून आज दिवसभरात 63,309 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 44,73,394 झाली आहे. रुग्णवाढ स्थिर असली तरी मृतांचा चढाच आहे. 524 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृत्यूचा दर 1.5 % इतका आहे. आज नोंद झालेल्या 985 मृत्यूंपैकी 392 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 251 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.तर 342 मृत्यू हे आठवड्यापेक्षा अधिक कालावधी पूर्वीचे आहेत. राज्यात आज रोजी एकूण 6,73,481 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा: कोरोना चाचण्यांचा वेग वाढणार; भारतात आणखी ६ कीट दाखल

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,65,27,862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44,73,394 (16.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 31,159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज 61,181 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेल्याचे सांगण्यात आले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.4 % एवढे झाले आहे.