esakal | निर्यातक्षम आंब्याच्या APEDA संकेतस्थळ नोंदणीत महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Mango

निर्यातक्षम आंब्याच्या APEDA संकेतस्थळ नोंदणीत महाराष्ट्र अव्वल

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : निर्यातक्षम शेतमालाच्या उत्पादन नोंदणीसाठी ‘अपेडा’ (APEDA) ने तयार केलेल्या संकेतस्थळावर यंदा निर्यातक्षम आंब्याच्या नोंदणीत महाराष्ट्राने अव्वल स्थान राखले आहे. दुसरीकडे यंदा प्रथमच नव्याने एक हजार १२८ बागांची नोंदणी करत डाळिंबामध्ये आंध्र प्रदेशाने आघाडी घेतली आहे.

...अशी झाली आहे नोंदणी

महाराष्ट्रातून डाळिंबाच्या ६२९ बागांची नोंदणी नूतनीकरणासाठी अर्ज दाखल झाले आहेत. याशिवाय नव्याने २६३, असे एकूण ८९२ डाळिंबांच्या बागांची नोंदणी संकेतस्थळावर झाली आहे. गुजरातमधून २१, कर्नाटकमधून ३५९ डाळिंब उत्पादकांनी नोंदणी केली आहे. मात्र आंब्याच्या १ नोव्हेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालखंडातील हंगामासाठी महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम आहे. महाराष्ट्रातून सहा हजार ५५८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्याखालोखाल कर्नाटकमधील नऊ हजार १३८, आंध्र प्रदेशातील दोन हजार ५३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. गुजरातमधील दोन हजार ११२, केरळमधील ११३, तमिळनाडूमध्ये १२८, तेलंगणामधील ३७५, उत्तर प्रदेशातील ३०४ आंबा उत्पादकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली आहे.

हेही वाचा: एकही शर्यत न हरलेला शिवा आयुष्याशी मात्र हरला

हेही वाचा: प्राचीन तीर्थक्षेत्र अंभोरा; पाण्याने भरलेले जलप्रदेश

loading image
go to top