pomegranatesakal
महाराष्ट्र बातम्या
Pomegranate : महाराष्ट्रातून डाळिंबाची २२ हजार टन निर्यात; महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर
नैसर्गिक संकटांवर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत.
सांगली - नैसर्गिक संकटांवर मात करत राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीसाठी पुढे येत आहेत. राज्यातून गेल्या नऊ महिन्यांत २२ हजार ३६० टन डाळिंबाची निर्यात झाली आहे. देशाच्या तुलनेत राज्यातून ७८ टक्के निर्यात होत असून निर्यातीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली.