मुंबई - गृह विभागाने राज्यातील पोलिस उपायुक्त, अधीक्षकपदावरील २१ आयपीएस अधिकाऱ्यांची गुरुवारी बदली केली. त्यानुसार रायगडच्या अधीक्षकपदी आंचल दलाल, पालघरच्या अधीक्षकपदी यतीश देशमुख, सिंधुदुर्गच्या अधीक्षकपदी मोहन दहिकर, रत्नागिरीच्या अधीक्षकपदी नितीन बगाटे यांनी नियुक्ती करण्यात आली. आंचल दलाल यांचे पती जितेंद्र डुड्डी हे पुण्याचे जिल्हाधिकारी आहेत.