
महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार, काही ठिकाणी नियम होणार शिथिल - टोपे
मुंबई : लॉकडाऊन उठणार नाही, मात्र त्यात शिथिलता आणण्यासंदर्भातील वक्तव्य आज राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केलं आहे. मात्र, त्यासंदर्भातील सविस्तर चर्चा आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत होऊ शकली नाहीये. (Maharashtra Unlock Coronavirus cases Cabinet Meeting cm uddhav thackeray rajesh tope)
राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी संध्याकाळी बैठक झाली. या बैठकीत राज्यातील करोनाच्या सद्य स्थितीबाबत चर्चा झाल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. राज्यात काही ठिकाणी करोना रुग्णांची संख्या कमी झाली. पण यावरुन संपूर्ण राज्यात आकडेवारी कमी झाली असे म्हणता येणार नाही. टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. निसर्ग चक्रीवादळानुसारच तौक्ते चक्रीवादळग्रस्तांनाही मदत दिली जाईल, असेही शिंदेंनी सांगितले.
हेही वाचा: मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताची मदत ठरणार कारणीभूत?
राजेश टोपे म्हणाले की, सरसकट लॉकडाऊन उठवला जाणार नाही, आज जो आहे त्यात शिथिलता देण्यात येईल. यामध्ये कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकली नाही. व्हेरियंटचा मुद्दा लक्षात घेऊन लॉकडाउनपूर्ण उठवण्यात येणार नाही, लॉकडाउन आहे तो वाढवायचा आहे; पण त्यात शिथीलता येईल. पुढील दोन दिवसांत याबाबत निर्णय घेण्यात येईल. टास्क फोर्स तसेच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन यावर निर्णय होईल,
बेड उपलब्धता आणि पॉझिटीव्हीटी दर महत्त्वाचे
बेड उपलब्धता आणि पॉझिटीव्हीटी दर हे महत्त्वाचे मुद्दे असतात, असे राजेश टोपे यांनी सांगितले. लॉकडाऊनमध्ये शिथिलता द्यायची आहे. याबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. इतक्यात संपूर्ण लॉकडाऊन हटवला जाणार नाही, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.
राज्यात ३ लाख १५ हजार एक्टिव्ह केसेस आहेत. ग्रामीण भागात छोटे घर असते. अशा घरात करोनाग्रस्ताचे विलगीकरण अशक्य आहे. अशा वेळी त्यांना विलगीकरण कक्षात नेणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारच्या आवाहनाला ग्रामीण भागातील जनतेने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन टोपेंनी केले.
Web Title: Maharashtra Unlock Coronavirus Cases Cabinet Meeting Cm Uddhav Thackeray Rajesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..