esakal | मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताची मदत ठरणार कारणीभूत?
sakal

बोलून बातमी शोधा

Mehul Choski's  run away from Antigua

मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासाठी भारताची मदत ठरणार कारणीभूत?

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाला (SBI) १४ हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला दुसरा प्रमुख आरोप मेहुल चोक्सी (Mehul Choksi) अँटिग्वा (Antigua) देशातून गायब झाल्याची चर्चा होती. पण तो आता कॅरेबियन बेटांवरील डॉमिनिका (Dominica) या देशात असल्याचं आणि त्याला तिथं अटक झाल्याचं इंटरपोलनं (Interpol) भारताला कळवलं आहे. यानंतर भारतानं नव्यानं चोक्सीच्या प्रत्यार्पणाच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान, भारतानं कोरोना काळात डॉमिनिकाला कोरोनाप्रतिबंधक लशींच्या (Corona vaccines) डोसची केलेली मदतच भारताच्या पथ्थ्यावर पडेल अशी शक्यता आहे. यामुळे चोक्सीला डॉमिनिकाकडून भारताच्या स्वाधिन केलं जाऊ शकतं. (Indias Help to Dominica may helpful for Mehul Choksis extradition)

हेही वाचा: मराठा समाजाचं दु:ख शरद पवारांना सांगितलं - संभाजी राजे

भारत सरकारसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी चोक्सीला भारतात आणण्याबाबतच्या संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच त्याला भारतात आणण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्यात येत आहेत, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. या वृत्तानुसार, मेहुल चोक्सी कॅरेबिअन बेटांवरील डॉमिनिका देशात आढळून आला असून त्याला तिथे इंटरोपलच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे, अशी माहिती बुधवारी इंटरपोलनं भारतीय अधिकाऱ्यांना आणि सीबीआयला दिली होती. ही खबर मिळताच भारतीय उच्चाधिकाऱ्यांनी मेहुल चोक्सीला डॉमिनिकातून भारतात आणण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु केली आहे.

हेही वाचा: ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

भारतीय अधिकाऱ्यांना अँटिग्वा सरकारनं पाठिंबा दिला आहे. चोक्सीवर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पण चोक्सीकडे अँटिग्वाचं नागरिकत्व असलं तरी त्याला आमच्या देशात न पाठवता थेट भारताच्या हवाली करण्याच्या सूचना अँटिग्वाचे पंतप्रधान गॅस्टन ब्रॉवनी यांनी म्हटलं होतं.

डॉमिनिकातून चोक्सीचं प्रत्यार्पण होण्याची भारताला आशा

भारत आणि डॉमिनिका या दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. कारण फेब्रुवारी महिन्यात भारतानं डॉमिनिकाला कोरोना प्रतिबंधक लस पाठवल्या होत्या. भारतानं लशींची मदत केल्याबद्दल डॉमिनिकाचे पंतप्रधान रुझवेल्ट स्केरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून धन्यवाद दिले होते. तसेच भारताच्या या दयाळूपणाबद्दल आम्ही या देशाचे आभार मानतो. लशींनंतर भारतानं डॉमिनिकाला पुन्हा एकदा मदत पाठवली होती. त्यामुळे भारताच्या मदतीला विसरता येणार नाही, असंही डॉमिनिकाचे पंतप्रधानांनी पत्रात म्हटलं होतं. यापार्श्वभूमीवर भारत आणि डॉमिनिका या देशांमध्ये निर्माण झालेले चांगले मैत्रीपूर्ण संबंध मेहूल चोक्सीला लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी कारणीभूत ठरतील असा कयास बांधला जात आहे.