esakal | काय सुरु, काय बंद? : जाणून घ्या राज्यातील महत्वाच्या शहरांची स्थिती
sakal

बोलून बातमी शोधा

malls in india

काय सुरु, काय बंद? : जाणून घ्या राज्यातील महत्वाच्या शहरांची स्थिती

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : राज्यात सोमवारपासून अनलॉकला (Unlocdk) सुरुवात होत आहे. मात्र, यासाठी राज्य शासनानं सरसकट निर्णय घेतलेला नाही. तर पॉझिटिव्ही रेट (Positivity rate) आणि ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी (oxygen bed occupancy) या निकषांच्या आधारे पाच गटांमध्ये या अनलॉकचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महापालिका यांचं या गटांनुसार वर्गिकरण करण्यात येणार आहे. पहिला ते पाचवा या क्रमानं या गटांमधील निर्बंध कठोर होत जाणार आहेत. दरम्यान, राज्यातील दहा महत्वाची शहरं नेमकी कुठल्या गटात मोडतात आणि त्यानुसार तिथली परिस्थिती कशी असेल? जाणून घेऊयात. (Maharashtra unlocking need to know what things started and closed)

१) मुंबई :

शहराचा 'तिसऱ्या' गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाला मुभा, हॉटेल-रेस्टॉरंट दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार, उद्यानं-मैदानं आणि सार्वजनिक ठिकाणं सकाळी ५ ते ९ पर्यंत सुरु राहणार. जिम-सलून-ब्युटी पार्लर सुरु.

काय बंद? - लोकल सर्वसामान्यांसाठी बंद, मॉल्स आणि थिएटर बंद राहणार.

२) ठाणे

शहराचा 'तिसऱ्या' या गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित उद्योग ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार, सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सरकारी आणि खासगी कार्यालय ५० टक्के क्षमतेनं सुरु राहणार, सांस्कृतीक आणि सामाजिक कार्यक्रमांना ४ वाजेपर्यंत परवानगी, उद्यानं-मैदानं-मॉर्निंग वॉकला पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत परवानगी, जिम-सलून-ब्युटी पार्लर-स्पा दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु, लग्न सोहळ्याचा ५० तर अंत्यविधीला २० जणांना परवानगी.

काय बंद? - लोकल सर्वसामान्यांसाठी बंद, मॉल्स आणि थिएटर बंद राहणार.

३) कल्याण-डोंबिवली

४) नवी मुंबई

५) पुणे

शहराचा 'तिसऱ्या' गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - सर्व प्रकारची दुकानं सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवांची दुकानं शनिवारी-रविवारी सायंकाळी ५ पर्यंत सुरु, हॉटेल्सला दुपारी ४ पर्यंत परवानगी, उद्यानं-मैदानं पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु, खासगी आणि सरकारी कार्यालयं दुपारी ४ पर्यंत सुरु, जीम-सलून-ब्युटी पार्लर सायं. ४ पर्यंत सुरु.

काय बंद? - मॉल्स आणि चित्रपटगृह बद राहणार.

६) पिंपरी-चिंचवड

शहराचा 'तिसऱ्या' या गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - सर्व प्रकारची दुकानं सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील, अत्यावश्यक सेवांची दुकानं शनिवारी-रविवारी सायंकाळी ५ पर्यंत सुरु, हॉटेल्सला दुपारी ४ पर्यंत परवानगी, उद्यानं-मैदानं पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु, खासगी आणि सरकारी कार्यालयं दुपारी ४ पर्यंत सुरु, जीम-सलून-ब्युटी पार्लर सायं. ४ पर्यंत सुरु.

काय बंद? - मॉल्स आणि चित्रपटगृह बद राहणार.

७) औरंगाबाद

शहराचा 'पहिल्या' गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - सर्व दुकानं उघडणार, मॉल्स-चित्रपटगृह-नाट्यगृह सुरु, हॉटेल्स-रेस्टॉरंट सुरु, उद्यानं-क्रीडांगणं सुरु, खासगी-सरकारी कार्यालयं १०० टक्के उपस्थितीत सुरु, सामाजिक-सांस्कृतीक-मनोरंजनाच्या कार्यक्रांना परवानगी, जिम-सलून-ब्युटी पार्लर सुरु.

काय बंद? - उद्योग-व्यवसायांना कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक, बसमध्ये उभं राहून प्रवासाला बंदी, लेवल पाच मधून जिल्ह्यात येणाऱ्यांना ई-पास आवश्यक.

८) नागपूर

शहराचा 'पहिल्या' गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - सर्व दुकानं सायं. ५ पर्यंत सुरु, मॉल्स-चित्रपटगृह सायं. ५ वाजेपर्यंत सुरु, लग्नासाठी १०० जणांना उपस्थितीला परवानगी, जिम-सलून-पार्लर सायं. ५ वाजेपर्यंत सुरु, दारूची दुकानं ५ पर्यंत सुरु.

काय बंद? - पूर्ण अनलॉक नाही. राजकीय-धार्मिक सोहळ्यांवर पूर्ण बंदी, संध्याकाळी ५ नंतर जमावबंदी.

९) नाशिक

शहराचा 'तिसऱ्या' गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - अत्यावश्यक सेवेची दुकानं दुपारी २ पर्यंत सुरु, लग्नासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी, बांधकामांना दुपारी ४ पर्यंत परवानगी, हॉटेल सुरु, क्रिडांगण-उद्यानं पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत खुली, खासगी-सरकारी कार्यालय दुपारी ४ पर्यंत खुली, जिम-पार्लर-सलून-व्यायामशाळा सुरु, कारखाने सुरु.

काय बंद? - सायं. ५ ते सकाळी ७ पर्यंत संचारबंदी, शनिवार-रविवारी वीकेंड लॉकडाउन, मॉल्स-थिएटर-नाट्यगृह बंद, बसमध्ये उभ्यानं प्रवासाला बंदी,

१०) कोल्हापूर

शहराचा 'चौथ्या' या गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

काय सुरु? - फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरु, हॉटेलमध्ये केवळ पार्सल सेवा सुरु, मैदानं-उद्यानं पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत सुरु, खासगी-सरकारी कार्यालयांमध्ये २५ टक्के उपस्थितीला परवानगी, लग्नासाठी २५ तर अत्यंविधीला २० जणांना परवानगी, जिम-सलून सकाळी ७ ते दुपारी ४ पर्यंत सुरु.

काय बंद? - मॉल्स, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद.

loading image
go to top