

Dark clouds gather over Hingoli district as unseasonal rainfall begins following IMD’s yellow alert for Vidarbha and Marathwada regions.
esakal
राज्यातील हवामानात सध्या वेगवान बदल होत असून, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज पूर्व विदर्भात वादळी पावसाची शक्यता वर्तवून येलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत विजांच्या कडकडाट्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान मराठवाड्यातील हिंगोली तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदियात सोमवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.