

महाराष्ट्रातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे फेरबदल दिसून येत आहेत. राज्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या लहरी हवामानाचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला असून, काढणीसाठी आलेली पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.