
राजकुमार घाडगे-सकाळ वृत्तसेवा
पंढरपूर : पंढरपूर शहर व ग्रामीण भागामध्ये मागील आठवडाभरापासून दररोज अवकाळी पाऊस बरसत आहे. पावसाळी वातावरणामुळे आंबा विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला असून येथील भाजी बाजारामध्ये आंबा विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. दरम्यान ग्राहकांनी पाठ फिरवल्याने आंबा बागायतरांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.