
विक्रमगड (बातमीदार) : सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत. त्यातच उपसागरात निर्माण होत असलेल्या चक्रवादळामुळे राज्यात वेळेआधीच पाऊस धडकणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. मे महिन्याच्या अखेरीस सर्वत्र शेतीच्या कामांना वेग आला असून अशातच पाऊस पडला तर शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागेल; या चिंतेने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. तसेच त्यांचे आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती वाटत आहे.