राज्यात 11 कोटी डोस पूर्ण; लसीकरणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर | Maharashtra vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

राज्यात 11 कोटी डोस पूर्ण; लसीकरणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर

मुंबई : कोविडशी (corona) सुरू असलेल्या लढाईत आरोग्य विभागाने (Health department) यशाचा आणखी एक टप्पा पार केला आहे. गुरुवारी राज्यातील एकूण लसीकरणाचा आकडा (vaccination report) 11 कोटींच्या पुढे गेला आहे. हा विक्रम करणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे उत्तर प्रदेशनंतर देशातील दुसरे राज्य (second rank in India) ठरले आहे.

हेही वाचा: वेतनवाढीनंतरही राज्यभरातील कर्मचारी संपावर ठाम

कोविड बॅकफूटवर आल्याने आणि सण-उत्सवांमुळे लसीकरणाचा आलेख घसरत होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून या मोहिमेला पुन्हा वेग आला आहे. गुरुवारी राज्यात 7 लाख 48 हजार 146 जणांना लसीकरण करण्यात आले. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यातील लसीकरणाचा आकडा 11 कोटी 64 हजार 358 वर पोहोचला होता. राज्यात 7 कोटी 24 लाख 15 हजार 788 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 3 कोटी 76 लाख 49 हजार 570 जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

अतिरिक्त आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, गुरुवारी सायंकाळी 5 वाजता लसीकरणाचा आकडा 11 कोटींच्या पुढे गेला. ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांनी जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेच्या यशामागे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे.

हेही वाचा: वेतनवाढीनंतरही राज्यभरातील कर्मचारी संपावर ठाम

16 दिवसांत एक कोटींचा टप्पा पार

राज्यात अवघ्या 16 दिवसांत 1 कोटी डोस देण्याचे काम करण्यात आले आहे. 9 नोव्हेंबर रोजी राज्यात 10 कोटी डोस देण्याचा विक्रम झाला होता, त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी 11 कोटींचा आकडा पार केला.

80% पहिला आणि 42% दुसरा डोस पूर्ण

राज्याची एकूण लोकसंख्या 18 वर्षे व त्यावरील 9.14 कोटी आहे. यामध्ये 80 टक्के लोकांना पहिला डोस मिळाला आहे, तर 42 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. राज्यात सुमारे 90 लाख लोक आहेत ज्यांनी दुसरा डोसचा कालावधी पूर्ण होऊनही लस घेतली नाही. ज्यांची लसीचा दुसरा डोस घेण्याची अंतिम मुदत चुकली असेल, त्यांनी जाऊन उर्वरित डोस घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

पहिला डोस- 7,24,15,788

दुसरा डोस - 3,76,49,570

एकूण डोस - 11,00,65,358

एकूण केंद्र- 8698

कोविशील्ड - 9,64,99,640

कोवॅक्सीन- 13327735

स्पुतनिक - 2,37,983

loading image
go to top