वेतनवाढीनंतरही राज्यभरातील कर्मचारी संपावर ठाम | St bus corporation strike | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus

वेतनवाढीनंतरही राज्यभरातील कर्मचारी संपावर ठाम

मुंबई : भाजपाचे आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau khot), गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी संपातून माघार घेतल्यानंतर आझाद मैदानातील (Azad maidan) एसटी कर्मचाऱ्यांसह (ST employee) राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी संप कायम ठेवण्याची (strike continue) भूमिका घेतली आहे. त्यामूळे गुरूवारी सुद्धा राज्यातील एकही आगार पूर्णत: सुरू होऊन एसटी बसेस (ST buses) रस्त्यांवर निघू शकल्या नाही.

हेही वाचा: Share Market update : सेन्सेक्स 454 अंश वाढला

परिवहन मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसात संप मागे घेण्यासाठी आझाद मैदानातील एसटी कर्मचारी आणि भाजपा आमदारांच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा सुरू होत्या. दरम्यान विलीनीकरणाच्या मागणीवर अभ्यास करणाऱ्या समितीच्या अहवालाला अद्याप वेळ लागत असल्याने सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन वाढवून देण्यावर भाजपा आमदार खोत आणि पडळकर यांचे एकमत झाले. मात्र शिष्टमंडळातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध करून शिष्टमंडळात फुट पडल्याचे दिसून आले.

त्यानंतर बुधवारी एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढ, इंन्सेंन्टिंव आणि कर्तव्यावर तात्काळ रुजू झाल्यास कारवाई रद्द करण्याचे आश्वासन परिवहन मंत्र्यांनी देऊनही गुरूवारी मात्र, एसटी कर्मचारी आपल्या संपाच्या भुमीकेवर ठाम दिसून आले. परिणामी राज्यभरातील एसटीचे आगार अंशतहा सुरू झाल्याचा दावा एसटी महामंडळ प्रशासनाने केला असला तरी, राज्यभरातील एसटी कर्मचारी संपातच दिसून आले आहे.

हेही वाचा: डोंबिवली : धावत्या लोकलमधून मोबाईल हिसकावणारा चोरटा गजाआड

"मागण्या मान्य झाल्यावर लढाई थांबवायची असते. काही कर्मचारी कामावर येऊ इश्चितात, तसे फोनही येत आहे. त्यांनी कामावर याव त्यांना सुरक्षा दिल्या जाणार, राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेऊन कर्तव्यावर रुजू व्हावे, तर मुंबईतील संपातील सहभागी एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवार पर्यंत रुजू व्हावे अन्यथा कठोर कारवाई केली जाणार."

- अॅड.अनिल परब, परिवहन मंत्री

"बुधवारी सह्यांद्री अतिथी गृहावर चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळातील एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम होते, तर भाजपा आमदारांनी वेतनवाढीवर संगणमत केल्याने, परिवहन मंत्र्यांची पत्रकार परिषद होईपर्यंत शिष्टमंडळातील नऊ एसटी कर्मचाऱ्यांना सह्यांद्री अतिथी गृहात डांबून ठेवण्यात आले होते. त्यामूळे हा संप विलीनीकरण होईपर्यंत सुरूच राहणार आहे."

- गुणरत्न सदावर्ते, वकील

"सरकारची वेतनवाढ मंजुर नाही. एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी आहे. जो पर्यंत विलीनीकरण होणार नाही. तोपर्यंत संप सुरूच राहणार आहे."

- शशांक राव, सरचिटणीस, संघर्ष एसटी कामगार युनीयन

loading image
go to top