लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर; ७ कोटींचा टप्पा पार | Maharashtra vaccination update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

लसीकरण मोहिमेत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानावर; ७ कोटींचा टप्पा पार

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेने (vaccination drive) यशाचा आणखी एक टप्पा पार केला आहे. बुधवारी राज्यात पहिला डोस घेणाऱ्यांची (vaccination first dose) संख्या 7 कोटींच्या पुढे गेली आहे. ही कामगिरी करणारे महाराष्ट्र (Maharashtra) हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. बुधवारी दुपारी 4 वाजेपर्यंत 6 लाख 34 हजार 760 जणांना लसीकरण करण्यात आले, त्यानंतर पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या 7 कोटी 1 लाख 18  हजार 259 झाली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने (health authorities) दिली आहे.

हेही वाचा: एसटीच्या 2296 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवामुक्तीच्या नोटीस

तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 3 कोटी 46 लाख 56 हजार 442 वर पोहोचली आहे. मात्र, पूर्वीच्या तुलनेत लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीकरण मोहिमेत 7 कोटी लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्याच्या बाबतीत राज्याने आणखी एक यश संपादन केल्याची माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

लसीकरणाच्या बाबतीत मुंबई राज्यात अव्वल ठरली आहे. बुधवारी मुंबईत 57,483  लोकांना लसीकरण करण्यात आले. मुंबईत आतापर्यंत 1 कोटी 55 लाख 3 हजार 921 लसीचे डोस देण्यात आले आहेत. त्यातून बाहेर 93 लाख 1 हजार 275 जणांनी पहिला डोस घेतला असून 62 लाख 2 हजार 646 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

loading image
go to top