Maharashtra Weather Update : विदर्भात थंडीची लाट ! गोंदियाने महाबळेश्वरलाही टाकले मागे ; राज्यातील इतर भागांत कसे आहे हवामान? जाणून घ्या

Vidarbha Cold Wave : विदर्भात थंडीची लाट जाणवत असून तापमानात मोठी घट नोंदवली गेली आहे. गोंदियात ८.२° C किमान तापमान नोंदले गेले असून ते महाबळेश्वरपेक्षाही थंड ठरले. नागपूरचे तापमान ८.५° C पर्यंत घसरल्याने थंडीची तीव्रता वाढली आहे.
Gondia records one of the lowest temperatures in Maharashtra as Vidarbha experiences an intense cold wave.

Gondia records one of the lowest temperatures in Maharashtra as Vidarbha experiences an intense cold wave.

esakal

Updated on

Summary

  1. उत्तर भारतातील कडाक्याच्या थंडीचा परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही दिसतो आहे.

  2. पंजाबच्या अदमपूरमध्ये देशातील सपाट भूभागावरील सर्वात कमी २.२° C तापमान नोंदले गेले.

  3. महाराष्ट्रातील अलिबागमध्ये देशातील सर्वाधिक ३६° C तापमान नोंदवले गेले.

राज्यात थंडी पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. दरम्यान विदर्भात थंडीची लाट आली असून पूर्व विदर्भात याचा जास्त प्रभाव जाणवत आहे. पारा चांगलाच घसरला असून गोंदियात (८.२ अंश सेल्सियस) सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली असून नागपूरचा पारा ८.५ अंशांवर आला आहे. यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे. गोंदियात राज्यातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरपेक्षाची (१३.२) कमी तापमानाची नोंद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com