esakal | अखेर सातारकरांनी शरद पवारांना गुलाल उधळायला बाेलावलेच I Election Result @019
sakal

बोलून बातमी शोधा

sharad pawar

पंतप्रधान नरेंद्र माेदी. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा ठरल्या कूचकामी.

अखेर सातारकरांनी शरद पवारांना गुलाल उधळायला बाेलावलेच I Election Result @019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा - लाेकसभा पाेटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे श्रीनिवास पाटील हे विजयाच्या वाटेवर आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार उदयनराजे भाेसले हजाराे मतांनी मागे पडले आहेत. पाटील हे विजयी हाेतील असा अंदाज बांधला जात आहे.

 
त्याधर्तवीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वाे शरद पवार मुंबईत पत्रकार परिषदेते म्हणाले सातारकरांचा मी विशेष आभारी आहे. सातारकरांचे मी तेथे जाऊन आभार मानणार आहे. 

गुलाल उधळायला बोलवालं ? 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या साताऱ्यातील मेळाव्यात शरद पवार यांनी आवाहन केले हाेते. ते म्हणाले 80 वर्षाचा म्हातारा काय करणार असे काहीजण म्हणताहेत; पण मी सांगतो, काय पाहिजे ते करायची माझी तयारी आहे. 14 तास काम करायची गरज असेल तर, 20 तास काम करेन, पण महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात जाऊ देणार नाही. या जिल्ह्याला क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण यांच्या स्वाभिमान व शौर्याचा वारसा आहे. छत्रपतींचा काळ असो, की स्वातंत्र्यपूर्व काळ, प्रतिकूल परिस्थीतीत योग्य निर्णय घेण्याची व संपूर्ण देशाला दिशा देण्याची ताकद या मातीत व इथल्या लोकांमध्ये आहे. 

तुम्ही साथ द्या. मतदानापुर्वी घरोघरी फिरा, सर्वांना बरोबर घ्या, क्रांतीसिंह व यवंतरावांच्या जिल्ह्यात लाचारीला थारा नाही, हे सर्वांना सांगा. विधानसभेच्या सर्व जागांसह लोकसभेमध्येही आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे काम करा असे सांगत गुलाल उधळायला मला बोलवालं अशी अपेक्षा श्री. पवार यांनी व्यक्त केली. त्यावेळी उपस्थितीत सर्वांनी हात उंचावून साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला.
 

loading image