esakal | विजयाचा टिळा कुणाच्या माथी; विधानसभेची आज मतमोजणी | Election Results 2019
sakal

बोलून बातमी शोधा

विजयाचा टिळा कुणाच्या माथी; विधानसभेची आज मतमोजणी | Election Results 2019

या चौदा मतदारसंघांचे निकाल चुकवू नका
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यातील चौदा मतदारसंघांवर विशेष लक्ष आहे. कारण, येथे प्रचार चुरशीने झाला होता. 

विजयाचा टिळा कुणाच्या माथी; विधानसभेची आज मतमोजणी | Election Results 2019

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तब्बल वीस दिवसांपेक्षाही अधिक काळ चाललेला तुफानी प्रचार, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, शह-काटशहाचे दरबारी राजकारण, सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांचे रोड शो, जाहीर सभांमुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला होता.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे पडघम थेट दिल्लीपर्यंत पोचले होते. प्रचाराच्या आखाड्यात प्रत्येकाने स्वत:ला अजमावून पाहिले. आता उद्याचा दिवस सर्वच पक्षांसाठी जजमेंट डे ठरेल, कारण मतदारराजाचा मतपेटीत कैद झालेला जनादेश समजणार आहे. महाराष्ट्राचा मतदाराजा कुणाच्या माथी विजयाचा टिळा लावतो, हेदेखील या निमित्ताने स्पष्ट होईल. 

या चौदा मतदारसंघांचे निकाल चुकवू नका
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. राज्यातील चौदा मतदारसंघांवर विशेष लक्ष आहे. कारण, येथे प्रचार चुरशीने झाला होता. 
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या पक्षांतराबरोबरच आरोप-प्रत्यारोपानेही हे मतदारसंघ गाजले.

या निकालांवर राज्याची आहे नजर

1. परळी : पंकजा मुंडे (भाजप) विरुद्ध धनंजय मुंडे (राष्ट्रवादी),

2. नागपूर नैर्ऋत्य : देवेंद्र फडणवीस (भाजप) विरुद्ध आशिष देशमुख (काँग्रेस)

3. दक्षिण कऱ्हाड : पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस) विरुद्ध अतुल भोसले (भाजप)

4. बीड : जयदत्त क्षीरसागर (शिवसेना) विरुद्ध संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी), अशोक हिंगे (वंचित बहुजन आघाडी)

5. कोथरूड (पुणे) : चंद्रकांत पाटील (भाजप) विरुद्ध किशोर शिंदे (मनसे)

6. येवला : छगन भुजबळ (राष्ट्रवादी) विरुद्ध संभाजी पवार (शिवसेना)

7. वरळी : आदित्य ठाकरे (शिवसेना) विरुद्ध सुरेश माने (राष्ट्रवादी)

8. कर्जत जामखेड : रोहित पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध राम शिंदे (भाजप)

9. कणकवली : नितेश राणे (भाजप) विरुद्ध सतीश सावंत (शिवसेना)

10. करमाळा : रश्‍मी बागल (शिवसेना) विरुद्ध संजय पाटील (राष्ट्रवादी), नारायण पाटील (अपक्ष)

11. हातकणंगले : सुजित मिणचेकर (शिवसेना) विरुद्ध राजू आवळे (काँग्रेस)

12. खेड-आळंदी : सुरेश गोरे (शिवसेना) विरुद्ध दिलीप मोहिते (राष्ट्रवादी), हिरामण कांबळे (वंचित आघाडी)

13. पुणे कॅंटोन्मेंट : सुनील कांबळे (भाजप) विरुद्ध रमेश बागवे (काँग्रेस), मनीषा सरोदे (मनसे)

14. बारामती : अजित पवार (राष्ट्रवादी) विरुद्ध गोपीचंद पडळकर (भाजप).