Vidhan Sabha Monsoon Session : सत्ताधारी की विरोधक? कोण गाजवणार विधानसभा पावसाळी अधिवेशन; 'या' मुद्द्यांवर होऊ शकते चर्चा

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे.
Maharashtra Vidhimandal
Maharashtra VidhimandalSakal
Updated on

अजित पवार यांनी २ जुलै रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होत आहे. हे पावसाळी अधिवेशन विरोधक की सत्ताधारी यापैकी नेमकं कोण गाजवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाचे विधामंडळाचे पावसाळी अधिवेशन लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे, कारण याआधी विरोधी पक्षनेते असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि त्यांचे समर्थक आमदार हे आता सत्तेत सहभागी झाले आहेत. तसेच राष्ट्रावदीत काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर राष्ट्रवादीकडे असलेल्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसकडून दावा केला जाऊ शकतो. त्यामुळे सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या प्रश्नांना कशी उत्तरे देतील हे पाहाणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Vidhimandal
Maharashtra Rain Update : येत्या ४ दिवसात पावसाचा जोर वाढणार! 'येथे' बरसणार जोरदार पाऊस

विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार?

दरम्यान अधिवेशनाच्या तोंडावर राज्यात विरोधी पक्षाकडे विरोधीपक्ष नेता कोण असेल हे अजून स्पष्ट झालं नाहीये. दरम्यान पावसाठी अधिवेशनाच्या पार्श्वभूमिवर विरोधीपक्ष नेत्यांची बैठक आज दुपारी होणार आहे.या बैठकीत विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार यावर चर्चा होणार आहे.

काँग्रेस विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते कोण याबद्दल दिल्लीतून निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रथेनुसार चहापाणाचा कार्यक्रम होणार असून विरोधकाकडून यावर बहिष्कार टाकला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra Vidhimandal
Maharashtra Politics : विरोधी पक्षनेतेपदावर पुण्यातील काँग्रेस आमदाराचा दावा; थेट पक्षाध्यक्षांना पाठवला बायोडेटा

कोणत्या मुद्यांवर होऊ शकते चर्चा

उद्यापासून सुरू होत असलेल्या पावसाठी अधिवेशनात शेतकऱ्यांचा प्रश्न विशेष गाजण्याची शक्यता आहे. तसेच पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांवर आलेले दुबार पेरणची संकट, शेतकऱ्यांना देण्यात आलेली मदत हा मुद्दा अधिवेशनात गाजू शकतो. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न अधिवेशनात चर्चेला येऊ शकतात.

तसेच राज्यात जातीय आणि धार्मिक हिंसाचाराच्या घटना, राज्यातील फोडाफोडीचे राजकारण, केंद्रीय यंत्रणांचा दबाव यासोबतच अब्दुल सत्तार कृषीमंत्री असताना त्यांच्या खात्याकडून टाकण्यात आलेल्या धाडी वादात सापडल्या होत्या हा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला जाऊ शकतो. तसेच संजय राठोड यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप हे मुद्दे पावसाळी आधिवेशनाच्या केंद्रस्थानी असू शकतात.

Maharashtra Vidhimandal
Maharashtra Politics : 'दिल्लीने शिंदे गटाला सांगितले की अर्थ खाते तुमच्याकडे आणि मुख्यमंत्रीपद अजितदादा यांना द्या'

कोणाकडे किती ताकद?

महाराष्ट्र विधानसभेत ऐकूण २८६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपकडे सर्वात अधिक १०५ आमदार आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याकडे ४० आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. सरकारला इतरही २० आमदारांचं समर्थन आहे.

तर अजित पवार यांच्यासोबत आतापर्यंत २४ आमदार गेले आहेत. त्यामुळे सत्तापक्षाकडे आतापर्यंत १८९ आमदारांचं समर्थन आहे. तर विरोधकांबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत ४४ आमदारांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे गटाकडे फक्त १५ आमदार उरले आहेत. तर शरद पवार गटाकडे १४ आमदार शिल्लक आहेत. राष्ट्रवादीच्या १५ आमदारांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाहीये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com