Vidhan Sabha 2019 : एक कोटी रोजगार; बारा तास वीजपुरवठा

मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, विनोद तावडे आदी.
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकात पाटील, विनोद तावडे आदी.

विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात राज्यात ७२ हजार पदे भरण्याची घोषणा करण्यात येऊनही प्रत्यक्षात त्याची अंमबजावणी झाली नसतानाही येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याचे वचन भाजपच्या आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘संकल्पपत्रा’त देण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे हंगामी अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील; तसेच विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आज ‘संकल्पपत्रा’चे प्रकाशन करण्यात आले. राज्याच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही त्यात देण्यात आली आहे. या ‘संकल्पपत्रा’त (जाहीरनामा) अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक; तर इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन पुन्हा देण्यात आले असून, ही स्मारके २०२० मध्ये पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गेल्या निवडणुकीत शिवसेनेशी फारकत घेऊन स्वबळावर लढणाऱ्या भाजपने २०१४ मध्ये पक्षाचा जाहीरनामा (दृष्टीपत्र) जाहीर केले होते. त्यात ही दोन्ही स्मारके उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत भाजपची सत्ता असतानाही या स्मारकांच्या भूमिपूजनाशिवाय काही काम झाले नसल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असताना याबाबत काहीच ठोस पावले सरकारकडून उचलताना दिसत नाही, असा आरोप विरोधकांकडून केला असता, गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात (२८ मार्च २०१८) राज्य शासनाच्या विविध विभागांतील ७२ हजार पदे येत्या दोन वर्षांत भरण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती.

नाराज असलेल्या धनगर समाजाला खूष करण्यासाठी जाहीरनाम्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या प्रयत्नासह, धनगर समाजासाठी एक हजार कोटींचे विशेष पॅकेज देणार असल्याचे वचन दिले आहे; तर मागासवर्गीयांच्या मतांवर डोळा ठेवत अनुसूचित जातीतील प्रत्येक कुटुंबाला घर देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात मराठा समाजालाही खूष ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आगामी पाच वर्षांत मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे वचन देण्यात आले आहे. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ६२० कोटींची तरतूद करणार असल्याच्या आश्वासनासह, येत्या पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. 

दुष्काळ, वीजपुरवठा, शिक्षण, आर्थिक विकास, सर्वसमावेशी विकास, सुरक्षित महाराष्ट्र, आरोग्य, महिला, शेती, जनसामान्यांचे कल्याण, विमान वाहतूक, बंदर विकास-जलवाहतूक, सिंचन-पाणीपुरवठा व ग्रामविकास, रेल्वेविकास, सुराज्य, शेतीसुविधा, रस्तेविकास अशा विविध बाबींवर या जाहीरनाम्यातून घोषणांचा वर्षाव करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com