Vidhan Sabha 2019 : उमेदवारांची संख्या यंदा घटली

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 October 2019

गेल्या दोन विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांची संख्या घटली आहे. या वेळी निवडणुकीत ३ हजार २३९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. २०१४ मध्ये ४ हजार ११९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

विधानसभा 2019 : मुंबई - गेल्या दोन विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत यंदा निवडणूक लढविणाऱ्या उमदेवारांची संख्या घटली आहे. या वेळी निवडणुकीत ३ हजार २३९ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. २०१४ मध्ये ४ हजार ११९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.

अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत १ हजार ५०४ उमदेवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता २८८ जागांसाठी ३ हजार २३९ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या ८८० ने कमी झाली आहे. निवडणुकीसाठी आघाडी आणि युती झाल्याने उमेदवारांची संख्या घटली आहे. यंदा शिवसेना-भाजपने एकत्रित २८८ उमेदवार उभे केले आहेत. तर काँग्रेसने १४६ व राष्ट्रवादी काँग्रेसने ११७ उमेदवार उतरवले आहेत. वंचित बहुजन आघाडीने २५० उमेदवार दिले आहेत. याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना १४२ च्या आसपास जागा लढवत आहे. मंदीचे वातावरण, निवडणूक व्यवस्थापन यंत्रणा तसेच कार्यकर्त्यांचा अभाव, निवडून येण्याची खात्री नसल्याने अनेक हौशी उमेदवारांनी निवडणुकीकडे पाठ फिरविल्याचे सूत्रांचे निरीक्षण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Vidhansabha 2019 Candidate Count less Politics