Vidhan Sabha 2019 : काठावर पास होणाऱ्या आमदारांच्या संख्येत घट

श्रीमंत माने
Friday, 1 November 2019

पाच हजारांपेक्षा कमी मतांनी निवडून आलेले
भारतीय जनता पक्ष - मंगेश चव्हाण (चाळीसगाव), गोवर्धन शर्मा (अकोला पश्‍चिम), हरीश पिंपळे (मूर्तिजापूर), मोहन मते (दक्षिण नागपूर), विकास कुंभारे (मध्य नागपूर), मदन येरावार (यवतमाळ), डॉ. संदीप धुर्वे (आर्णी), मेघना बोर्डीकर (जिंतूर), कुमार आयलानी (उल्हासनगर), राहुल कुल (दौंड), भीमराव तापकीर (खडकवासला), बबनराव पाचपुते (श्रीगोंदा), राम सातपुते (माळशिरस), जयकुमार गोरे (माण).

शिवसेना - किशोर पाटील (पाचोरा), दिलीप लांडे (चांदिवली), संजय पोतनीस (कलिना), शहाजीबापू पाटील (सांगोला).

राष्ट्रवादी काँग्रेस - मनोहर चंद्रिकापुरे (अर्जुनी मोरगाव), राजेश टोपे (घनसावंगी), माणिकराव कोकाटे (सिन्नर), दत्तात्रय भरणे (इंदापूर), सुनील टिंगरे (वडगाव शेरी), चेतन तुपे (हडपसर), आशुतोष काळे (कोपरगाव), संदीप क्षीरसागर (बीड), राजेश पाटील (चंदगड).

काँग्रेस - के. सी. पाडवी (अक्‍कलकुवा), अमित झनक (रिसोड), सुभाष धोटे (राजुरा), मोहनराव हंबर्डे (नांदेड दक्षिण).

इतर पक्ष - फारूक शहा (एमआयएम, धुळे), विनोद निकोले (माकप, डहाणू), राजेश पाटील (बविआ, बोईसर), रईस शेख (सप, भिवंडी पूर्व)

अपक्ष - चंद्रकांत पाटील (मुक्‍ताईनगर), राजेंद्र राऊत (बार्शी).

पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे
नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९ टक्‍के आमदार पाच हजारांपेक्षा कमी फरकाने विजयी झाले होते. यंदा ही संख्या ३७ पर्यंत खाली आली आहे.

विशेष म्हणजे, तेराव्या विधानसभेतील अशा ५५ आमदारांपैकी तब्बल ३४ आमदार चौदाव्या विधानसभेत दिसणार नाहीत. भाजप व शिवसेना युती करून, तर दोन्ही काँग्रेस आघाडी बनवून रिंगणात उतरल्या होत्या.

परिणामी, काठावरच्या अनेकांचा पराभव झाला. काही जण पुन्हा रिंगणातच उतरले नाहीत, तर तिकीट नाकारलेल्या काहींनी अपक्ष बनून जनमताचा कौल मागितला. परंतु, मतदारांनी त्यांना नाकारले. विशेष म्हणजे, गेल्या वेळी काठावर निवडून आलेले सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे बहुतेक आमदार पुन्हा निवडून येताना मात्र अधिक मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले आहेत. सत्तेचा फायदा वाढीव जनमत मिळविण्यासाठी त्यांना झाला.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे (फुलंब्री) आणि डॉ. संजय कुटे (जळगाव जामोद) व बबनराव लोणीकर (परतूर), अतुल सावे (औरंगाबाद पूर्व), विद्या ठाकूर (गोरेगाव) हे मावळत्या सरकारमधील मंत्री, तसेच रणधीर सावरकर (अकोला पूर्व), लखन मलिक (वाशीम), राजेंद्र पाटणी (कारंजा लाड), महेश चौघुले (भिवंडी पश्‍चिम), मंदा म्हात्रे (बेलापूर), कॅप्टन आर. तमिळसेल्वम (सायन कोळीवाडा) या भाजपच्या आमदारांचा वाढीव मताधिक्‍यासाठी सत्तेचा लाभ मिळालेल्यांमध्ये समावेश आहे. यवतमाळमधून मदन येरावार यांना मात्र पुन्हा निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसचे कालिदास कोळंबकर (वडाळा) व अपक्ष गणपत गायकवाड (कल्याण पूर्व) हे या वेळी भाजपच्या तिकिटावर लढले आणि विजयी झाले. उदेसिंग पाडवी (शहादा), प्रभुदास भिलावेकर (मेळघाट), विष्णू सवरा (विक्रमगड) व नरेंद्र पवार (कल्याण पश्‍चिम) यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra vidhansabha 2019 MLA Win Politics