Vidhan Sabha 2019 : चुरशीची लढत : परळी; आरपारची लढाई सुरू

Pankaja-and-Dhananjay
Pankaja-and-Dhananjay

विधानसभा 2019 : बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागलंय. ही लढच चर्चेचीच नाही तर चुरशीची आहे. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पाच वेळा या मतदारसंघातून प्रतिनिधित्व केले आहे. तर पंकजा मुंडे यांनी दोन वेळा. केंद्र, राज्य सरकार व जिल्हा परिषदेच्या निधीतून विविध विकासकामे आणि वैद्यनाथ कारखाना, वैद्यनाथ बॅंक या संस्थांसह गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिलासादायक उपक्रमे ही या पंकजा मुंडे यांची शक्तिस्थाने आहेत. तर कार्यकर्त्यांची फळी, नगरपालिका, पंचायत समिती, बाजार समिती या संस्थांवर वर्चस्व आणि सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रमांत सहभाग आणि अडचणींत धावून जाणे यामुळे धनंजय मुंडे यांनीही प्रभाव पाडला आहे. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक व शेतकरी उपयोगी उपक्रम राबवून त्यांनीही दिलासा दिला आहे.

पंकजा मुंडे
बलस्थाने -

    वैद्यनाथ देवस्थानचा १३३ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर.
    गावागावांत रस्ते, नाल्या, पथदिव्यांची उभारणी.
    ३६४ किमी रस्ते आणि तीन राष्ट्रीय महामार्गांची कामे.
    जलयुक्त शिवार योजनेतून कामे.
    २८०० बचत गटांची स्थापना करून महिला सक्षमीकरण चळवळीला बळ. 
    गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिबिरात पावणेदोन लाख रुग्णांची तपासणी.

कमजोरी -
    कामांच्या दर्जाबाबत ओरड. 
    संपर्क आणि मतदारसंघातील उपलब्धतेबाबत ओरड.
    वाण धरणात माजलगाव धरणाचे पाणी आले नाही.
    मतदारसंघात औद्योगिक वसाहतीसह नवीन उद्योग नाही.
    वैद्यनाथ कारखान्याकडून देयके वेळेत मिळत नाहीत, थकीत वेतन आदींबाबत नाराजी.

धनंजय मुंडे
बलस्थाने -

    नगरपालिका, दोन पंचायत समित्या, बाजार समिती व सात जिल्हा परिषद गटांवर वर्चस्व.
    नाथ प्रतिष्ठानकडून शेतकऱ्यांना दहा रुपयांत जेवण.
    सौर ऊर्जा प्रकल्प व सिमेंट कंपनीची मतदारसंघात उभारणी, रोजगार उपलब्ध करून दिले.
    पालिकेच्या माध्यमातून भूमिगत गटार योजना, रंगमंदिर व व्यापारी संकुलाची उभारणी.
    पक्षाकडील दुसऱ्या क्रमांकाचे विरोधी पक्षनेतेपद. 
    परळी शहरातील विविध समाजांसाठी सभागृहांची उभारणी.

कमजोरी -
    संस्थांवर वर्चस्व असले तरी त्या माध्यमातून होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत ओरड.
    जगमित्र कारखाना नावापुरताच, सूतगिरणीही बंद पडली.
    प्रस्तावित पाणी योजना रखडली.
    निकटवर्तीयांच्या व्यवहारांबाबत मतदारसंघात चुकीची चर्चा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com